बांदा येथे येत्या रविवारी भव्य रक्तदान शिबीर
बांदा
*दिनांक १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन आहे. त्यानिमित्त कट्टा कॉर्नर बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे.*
_*जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य आहेच, परंतु सर्वच रक्तपेढयाप्रमाणे सध्या जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये सुद्धा रक्ताचा भयंकर तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.*_
*हे रक्तदान शिबीर श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा, सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा, ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बांदा यांच्या सहकार्याने येत्या रविवारी दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.*
_*तरी इच्छुक रक्तदात्यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष दयानंद गवस (9821444170), सचिव बाबली गवंडे (8390905269) स्वराज्य प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर (9763717790), अक्षय मयेकर (9503871924), सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळाचे नाना शिरोडकर (9767577774), ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे सचिव गुरुनाथ नार्वेकर (9422379346) आणि समीर परब (9823830119) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.*_
