You are currently viewing अजयकुमार सर्वगोड यांचा मंत्री नितेश राणेंकडून विशेष सन्मान
Oplus_16908288

अजयकुमार सर्वगोड यांचा मंत्री नितेश राणेंकडून विशेष सन्मान

४० वर्षांच्या शासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याची घेतली दखल

सावंतवाडी : ४० वर्षे शासकीय सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या अजयकुमार सर्वगोड यांचा जाहीर कार्यक्रमात नामोल्लेख करत मंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जाहीर व्यासपीठावरून तळवणे येथील जहाज बांधणी भूमिपूजन कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात विविध मान्यवरांचे सन्मान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सूत्रसंचालकाला अजयकुमार सर्वगोड यांना आमंत्रित करण्यास सांगितले. यावेळी श्री. सर्वगोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विकासात्मक कामात त्यांनी घेतलेल्या मेहनतीची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचे सांगत भाषणादरम्यान श्री. राणे यांनी त्यांचे विशेष धन्यवाद दिले.

या सन्मानानंतर निवृत्त अधिकारी श्री. सर्वगोड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘पुढे काय?’ हा प्रश्न समोर असतानाच, मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे भाग्य मिळाले. माझ्या कामाची दखल घेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तळवणे येथे आयोजित जहाज बांधणी उद्योगाच्या भूमिपूजन सोहळ्यात मंत्री श्री. राणे यांनी जाहीर व्यासपीठावर नामोल्लेख करत सत्कार केला.

निवृत्तीनंतर अधिकाऱ्यांना विस्मरणात ढकलले जाते. मात्र, सेवानिवृत्त होऊनही सातत्याने मिळणारा हा मान-सन्मान पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो, अशा भावना श्री. सर्वगोड यांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा