You are currently viewing मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘जागतिक नेत्रदान दिन’ उत्साहात साजरा.
filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; hdrForward: 6; shaking: 0.030955; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0090,0.0011; brp_del_sen: 0.1300,0.1300; delta:1; bokeh:1; ispap:1; papproctime: 2026:06:10 10:37:03; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.44138908, 0.5836537);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 204.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 41;zeissColor: bright;

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘जागतिक नेत्रदान दिन’ उत्साहात साजरा.

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘जागतिक नेत्रदान दिन’ उत्साहात साजरा.

चिपळूण (मांडकी-पालवण)

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था ,मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘जागतिक नेत्रदान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना नेत्रदानाचे महत्त्व समजावे आणि अवयवदानाबद्दल त्यांच्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रमुख प्राध्यापक श्री. ज्ञानोबा बोकडे यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अवयवदान हे श्रेष्ठ दान कसे आहे, यावर प्रकाश टाकला.
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. “नेत्रदान हे कशा पद्धतीने मानवी जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि एका व्यक्तीने केलेले नेत्रदान दुसऱ्याच्या अंधःकारमय जीवनात कशा प्रकारे प्रकाश आणू शकते,” हे त्यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले.कार्यक्रमाच्या शेवटी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. कृषीराज मोरे याने उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला डॉ. संकेत कदम प्राचार्य, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, श्री. बाळासाहेब सूर्यवंशी उपप्राचार्य, जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, श्री. ज्ञानोबा बोकडे ,कार्यक्रम अधिकारी व प्रमुख राष्ट्रीय सेवा योजना. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा