*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांचा..थांबा…!पाॅज..माझा*
आयुष्य.. रिवाइंड करतांना
खिदळणा-यांची संख्या वाढली
शब्दांनीच..आताश्या दुरावा धरला
धांडोळ्यातून मागोव्याची वाट चुकली
खरिपापूर्वीचं..शब्दांच पीक
भोगल्या…टंचाईच्या झळा
अर्थवाही पाॅज घेतला..माझामीच
कुठवरं जपायचा..हा लळा
शब्दथांब्याना मिळेना छत
शब्दनिधीसाठी चणचण भासली
माणुसकी जपणारी व्यक्तीमत्व
दुर्मीळचं……होत चालली
शब्दमाझे..पाॅज ..माझाथांबा
आचारसंहितेला …ब्रेक दिला
अंगणवाड्या जागेविना पोरक्या
आयुष्याचा ..समतोल वाढला
भान हरवलेले..शब्दथांब्याचे
माथ्यावरून..मेंदूकडे सरकले
शब्दांना पेलायच्या सामर्थ्यावर
प्रसवशील उजेडात 🌟 चमकले
बाबा ठाकूर
