You are currently viewing गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रवास अधिक बळकट; भोसले नॉलेज सिटीचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रवास अधिक बळकट; भोसले नॉलेज सिटीचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रवास अधिक बळकट; भोसले नॉलेज सिटीचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात

शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा गौरवशाली टप्पा

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या भोसले नॉलेज सिटीच्या १२ व्या वर्धापन दिनाची सुरुवात शनिवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झाली. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

या महापूजेचे यजमानपद संस्थेच्या सदस्या आस्था सावंत-भोसले यांनी स्वीकारले. वेदमंत्रांच्या घोषात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पूजा विधिवत संपन्न झाली. त्यानंतर आरती व स्तोत्रगायन करण्यात आले. उपस्थितांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवत संस्थेच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सावंत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा तसेच सर्व प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या बारा वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याच्या बळावर भोसले नॉलेज सिटीने शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना या महापूजेद्वारे मंगलमय प्रारंभ झाला असून संपूर्ण परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा