युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सावंतवाडी/प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजप जनसंपर्क कार्यालय येथे “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम आयोजित करण्यात आला. “आईच्या नावाने एक झाड, पर्यावरणासाठी मोठे योगदान” हा संदेश देत महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, सावंतवाडी मंडल युवा अध्यक्ष हितेन नाईक, सावंतवाडी मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्रप्रमुख गोविंद साटेलकर, सुदेश नेवगी, पंकज तळसुलकर, अभिजित धुरी, विनेश तावडे, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई, श्रीकांत राज्याध्यक्ष यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
