You are currently viewing सावंतवाडी येथे गुणगौरव समारंभाचे आयोजन

सावंतवाडी येथे गुणगौरव समारंभाचे आयोजन

*सावंतवाडी येथे गुणगौरव समारंभाचे आयोजन*

सावंतवाडी,

बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी यांच्या वतीने पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १० वी) तसेच उच्च माध्यमिक परीक्षा (इयत्ता १२ वी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व मान्यवरांच्या स्वागताने होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष आयु. जगदीश चव्हाण असणार आहेत. उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष आयु. प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज कल्याण विभाग सिंधुदुर्गचे निरीक्षक महेंद्र मेन हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह तसेच समितीचे पदाधिकारी, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोषाध्यक्ष केशव जाधव, उपाध्यक्ष अनिल जाधव, सचिव सगुण जाधव, सहसचिव सदगुरू जाधव यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा