कणकवली / कलमठ :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
एमपायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सौ. सुप्रिया मेस्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री हेही उपस्थित होते.
सदिच्छा भेटीदरम्यान संतोष चव्हाण यांनी सौ. सुप्रिया मेस्त्री यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
