You are currently viewing दृष्टीबाधितांसाठी NAB सिंधुदुर्गला नेत्र तपासणी वाहन भेट

दृष्टीबाधितांसाठी NAB सिंधुदुर्गला नेत्र तपासणी वाहन भेट

दृष्टीबाधितांसाठी NAB सिंधुदुर्गला नेत्र तपासणी वाहन भेट

स्नेहमेळाव्यात दृष्टीबाधित लाभार्थ्यांचा संस्थेप्रती कृतज्ञतेचा भाव; मोतीराम मिसाळ यांच्याकडून ₹५१ हजारांची देणगी

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग, भटवाडी-सावंतवाडी यांच्या वतीने नेत्र रुग्णालयासाठी नेत्र तपासणी वाहन प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या वाहनाचे उद्घाटन सौ. सीमा अनंत उचगावकर (मिशाळ) यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, तर कोल्हापूरचे उद्योगपती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास अंध लाभार्थी अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे, सचिव सोमनाथ जिगजींनी, श्री उत्तम धुरी, श्री शिवकुमार उचगावकर, अॅड. प्रकाश परब, डॉ. सुहास नायडू, श्री आबासाहेब कशाळीकर, श्री दिलीप म्हापसेकर, श्री कांबळेसर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यानंतर आयोजित दृष्टीबाधितांच्या स्नेहमेळाव्यात लाभार्थ्यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गेली ३५ वर्षे NAB संस्था दृष्टीबाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून, त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही दृष्टीबाधित व्यक्ती भीक मागताना दिसत नाही, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. NAB आणि आमचे मार्गदर्शक श्री अनंत उचगावकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही उद्योगप्रिय आणि स्वावलंबी झालो,” अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.

या वेळी अंध लाभार्थी श्री राजेंद्र मेस्त्री, बाबुराव गावडे, अनिल शिंगाडे, कशीबाई पाटील, शेखर आळवे आदींनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटक सौ. सीमा अनंत उचगावकर यांनीही NAB संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे यांनी NAB च्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक करत भविष्यातही सहकार्य सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी संस्थेला ₹५१ हजारांची देणगी जाहीर केली. तसेच अॅड. प्रकाश परब यांनी ₹१० हजारांची देणगी जाहीर केली. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

समारंभात दृष्टीबाधित लाभार्थ्यांना टी-शर्ट व साड्यांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री मोतीराम मिसाळ यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच सौ. सीमा अनंत उचगावकर यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सहभोजनाच्या कार्यक्रमानंतर हा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा