You are currently viewing वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा

*वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून,भराव टाकत अनधिकृतपणे रस्ता केलेल्या परप्रांतीयांवर कडक कारवाई करा*

*मा.आ. वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी*

*कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला पंचनामा;कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा*

मालवण

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे समुद्रकिनारी परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून त्या जमिनीच्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील ओहळात मातीचा भराव टाकून स्थानिक मच्छिमारांना दमदाटी करत अनधिकृतपणे रस्ता केला आहे. हा ओहळ बुझविल्याने ओहळाचे पाणी आता मच्छिमारांच्या घरात घुसणार असून त्यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर परप्रांतीयांनी तेथील कांदळवन देखील नष्ट केले आहे. वायंगणी समुद्रकिनारा कासव संवर्धनासाठी ओळखला जातो मात्र अनधिकृत टाकलेल्या भरावामुळे कासव संवर्धन देखील धोक्यात आले आहे. याविरोधात वायंगणी येथील स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमारांनी आवाज उठवत माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक व शासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्यानुसार आज कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणचा पंचनामा केला.यावेळी वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देऊन संबंधित परप्रांतीयांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. तसेच त्याठिकाणचा भराव जिल्हा प्रशासनाने संबंधित परप्रांतीयांकडून तात्काळ काढून घ्यावा अशी मागणी स्थानिक मच्छिमार आणि वैभव नाईक यांनी केली. अन्यथा स्थानिक मच्छिमारांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वैभव नाईक यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख निलेश चमणकर, उपतालुकाप्रमुख सुमन कामत,जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, मालवण कांदळवन विभागाचे वनक्षेत्रपाल महादेव शिंगाडे, वेंगुर्ले कांदळवन विभागाचे वनपाल सुनील सावंत,वनरक्षक अजित भोसले, पोलीस पाटील स्वप्नाली मसुरकर यांसह स्थानिक नागरिक ओंकार पंडित, काशीराम खोबरेकर, बाबा केळूसकर, प्रमोद केळूसकर, हेमंत येरागी, किशोर तारी, जयेंद्र येरागी, मदन खोबरेकर, रमेश खोबरेकर, रोहन खोबरेकर, बाळकृष्ण खोबरेकर, संजय येरागी,नरहरी तोरस्कर, सारिका खोबरेकर, हिमाली येरागी, कामिनी खोबरेकर, शितल खोबरेकर, शुभांगी तारी, शारदा कोचरेकर, मंगला तोरस्कर, सुनीता तोरस्कर, रोहित खोबरेकर, सुनील खोबरेकर, स्नेहल खोबरेकर, जयेश तोरस्कर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा