You are currently viewing बाप

बाप

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी लेखिका कवयित्री अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप*

 

आईची थोरवी सगळेच गातात

बापाला मात्र कमी का लेखतात

आई थोरच असते

हे तर सर्व मान्यच आहे

पण बापही थोर असतो

हेही ध्यानात घेतल पाहिजे

 

आई घर सांभाळते

मुलांचे संगोपन करते

तेव्हा बाप भटकत असतो

वणवण

 

घर चालवान्यासाठी काळजी करीत

दारिद्याचे चटके स्वतः सोसत

 

आई धरणीसारखी असली

तर बाप असतो आकाशासारखा

आई असते वेलीसारखी

तर बाप असतो झाडासारखा

 

दुःख झालं तर

आपण आईला आठवतो

संकट आलं तर

बाप रे म्हणतो

 

म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे

बापही आहे श्रेष्ठ

बापही आहे थोर

फणसासारखा आतून मऊ

वरुन दिसतो जरी कठोर

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा