*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*=== चंद्र आणि चांदणी ===*
पुनवेच्या चांदराती, चांदणीसह चंद्र निघे
वाऱ्यावर केस उडे, माथा चंदन शोभे
राजमुकुट डोक्यावर, हरिणाची चाल असे
डाव्या हातात तिथे, चांदणीचा हात दिसें…1
पौर्णिमेच्या रात्रीमध्ये, निलगगन शांत वसे
मंद मंद पवन हलत, पुलकीत तन मन करे
वा्युच्या झोतासह, चांदणीचा पदर ढळे
नजर भिडे आणि झुके, किलबिल ती मनामध्ये.. 2
विचारतो चंद्र हळूच, नयन तुझे का झुकले
गगनीच्या तारा या, आज कुठे का दडीले
हळू हळू वर पाहे, लाजेने मान झुके
बोलण्याचे बाकी जे, स्तिमित ओठ बोलले. 3
नयनी मग चंद्राच्या, मादकता वास करे
अबोल ते बोल सर्व, ओठावर पसरले
चंद्राने चांदणीला, बहुमध्ये समिटले
बोलें प्रिय मधुयामिनी, आज अपुला दिन असे… 4
*………पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक*
