*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आभाळ चांदण्यांचं*
आभाळ चांदण्यांचं
लखलखते सुंदर झुंबर
निळे अंबर
लोभस….!!
तारकांच्या माळा
सजल्या सावळ्या गगनात
ज्योती उजळतात
तेजःपुंज…..!!
नक्षत्रे चमकतात
शर्वरी गडद होते
कुमुदिनी उमलते
तळ्यात….
भास आभासाची
जादुई घडते किमया
अंधाराची माया
दाटते……
झुडुपांवरील काजवे
भासे माळ चांदण्यांची
आरास रानाची
लखलखीत….!!
दवाचे थेंब
दिसते चांदण माळ
होता सकाळ
लुप्त…..!!
कुरळ्या कुंतलावर
थेंब पावसाचे थबकती
चमकते मोती
सुरेख…..!!
संध्येच्या कटिवर
चांदण माळ तेजस्वी
उजळते मनस्वी
नभांगण……!!
००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
