You are currently viewing माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची भव्य इमारत ग्रामीण भागातील माजी विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत- वैभव नाईक

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची भव्य इमारत ग्रामीण भागातील माजी विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत- वैभव नाईक

*माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची भव्य इमारत ग्रामीण भागातील माजी विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत- वैभव नाईक*

*कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा ‘माजी विद्यार्थी स्नेहमेळावा’ उत्साहात संपन्न*

*वैभव नाईक यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन*

ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून त्या समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. १९६६ साली स्थापन झालेल्या कळसुली शिक्षण संस्थेने गेल्या अनेक दशकांत हजारो गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला दिशा दिली आहे. मात्र आज ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था संकटात सापडत असून शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु कळसुली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिल्याने आज कळसुली हायस्कूलची २ कोटींची भव्य आणि अद्ययावत इमारत उभारण्यात आली आहे हे कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीने ग्रामीण भागातील शाळा टिकविण्यासाठी तेथील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि तसा आदर्श कळसुली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे.असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थी व परिवार स्नेहमेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सरस्वती पूजन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ७५ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर,माजी विद्यार्थी अध्यक्ष भालचंद्र दळवी, कळसुली शिक्षण संघ अध्यक्ष सूर्यकांत दळवी, कळसुली शिक्षण संघ कार्याध्यक्ष विजय सावंत, माजी जि. प. अध्यक्ष आर. बी.दळवी, चेअरमन स्कूल कमिटी के. आर. दळवी, मुख्याध्यापक व्ही. व्हि. वगरे, माजी जि. प. सदस्य सुगंधा दळवी, कृषी शास्त्रज्ञ विजय सावंत, विजय दळवी, कमलाकर राणे, शिवराम सुतार, बापू खरात, माजी व्हाईस चेअरमन डी. जी. तेली, गोविंद वारंग, अरविंद दळवी, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्य भारती देसाई ,दशरथ परब, अंकुश परब, कांता देसाई, एस. के. सावळ, रामचंद्र नाईक, माजी मुख्याध्यापक एस. एस. दळवी,माजी विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वैभव नाईक पुढे म्हणाले, “आज आपण ज्या शाळेचा अभिमान बाळगतो, ती संस्था उभारण्यामागे तत्कालीन शेतकरी कुटुंबातील सामान्य लोकांचे मोठे योगदान आहे. सत्तर ते शंभर वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शिक्षणाची साधने नव्हती. त्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखून गावातील लोकांनी शाळा उभी करण्याचे स्वप्न पाहिले. ही त्यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी होती.”कणकवलीत एम. हायस्कूलनंतर उभी राहिलेली ही संस्था आज शिक्षणाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवत आहे. कळसुलीतील प्रत्येक घरात एखादा उच्चशिक्षित व्यक्ती दिसतो आणि त्याचे श्रेय या संस्थेला जाते. सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा म्हणून आजही ओळखला जातो.” गावांच्या विकासासाठी जलस्रोत महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या विविध धरण प्रकल्पांचा उल्लेख केला. “आंब्रड, कळसुली, भडगाव आणि घोडगे परिसरात धरण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. भविष्यात या भागाला पाण्याची मोठी उपलब्धता होणार असून गावांची समृद्धी वाढेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा