You are currently viewing ओटवणेत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

ओटवणेत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

ओटवणेत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

जय भीम युवक मंडळातर्फे रॅली, स्नेहभोजन, मान्यवरांचा सत्कार व रात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन

सावंतवाडी, ता. १३ : ओटवणे येथील जय भीम युवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज भारतरत्न यांची जयंती विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने होणार आहे. त्यानंतर लहान मुलांच्या विचारांना व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांच्या भाषणांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जयंतीनिमित्त ओटवणे गावातून भव्य रॅली काढण्यात येणार असून दुपारी सर्व समाजबांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून ग्रामस्थांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे रात्री सादर होणारे ‘उंबरठ्यावरी मापं ठेविले’ हे तीन अंकी नाटक. या नाट्यप्रयोगातून रसिकांना दर्जेदार कलाविष्कार अनुभवता येणार आहे.

ओटवणे व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय भीम युवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा