सावंतवाडी बांदा रोड गरड येथे झाडावर लटकणारी धोकादायक फांदी दोन दिवसात न तोडल्यास त्याचं झाडाखाली बसून आंदोलन करणार- रवी जाधव
सावंतवाडी
गेले पंधरा दिवसापासून पाहतोय सावंतवाडी बांदा हायवेवरील गरड तीठ्यावर रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडावर सुकलेली फांदी लटकत आहे. दिवसाला हजारो वाहने त्यात रस्त्यावरून गोवा व मुंबई या दिशेने जा – ये करत असतात परंतु या गंभीर बाबीची दखल अजून कुणीच घेतली नाही. कालच झालेल्या वादळी पावसात शहराला त्याचा जोरदार फटका बसला अशाच वादळी पावसात ती सुकलेली भली मोठी फांदी रस्त्यावर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशा प्रकारचे अपघात झालेले रुग्ण आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले कोणाचा प्राण गेला तर कोणाला कायमचे अपंगत्व आले अशा गोष्टींकडे शासनाने कान- डोळा करू नये एवढीच विनंती मी प्रशासनाला करत आहे तरी या गंभीर बाबीची दखल बांधकाम विभागाने तत्काळ न घेतल्यास येत्या दोन दिवसात त्या झाडाखाली बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा रवी जाधव यांनी दिला त्यानंतर वाहतुकीस अडथळा किंवा अन्य काही प्रकार घडल्यास सदर बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे याची नोंद घ्यावी असे रवी जाधव यांनी सांगितले आहे.
