You are currently viewing लॅब ऑन व्हील्स मुळे ग्रामीण शिक्षणाला विज्ञानाची नवी झेप

लॅब ऑन व्हील्स मुळे ग्रामीण शिक्षणाला विज्ञानाची नवी झेप

लॅब ऑन व्हील्स मुळे ग्रामीण शिक्षणाला विज्ञानाची नवी झेप;

*REAT चे पहिले अधिवेशन पुण्यात उत्साहात संपन्न*

*पुणे*

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक विज्ञान शिक्षणाची दारे खुली करण्याच्या उद्देशाने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, सांगली, १९९४ च्या बॅच ने चालू केलेल्या रुरल एज्युकेशन ॲडव्हान्समेंट ट्रस्ट (REAT), पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “लॅब ऑन व्हील्स” या अभिनव उपक्रमाचे पहिले अधिवेशन डेक्कन कॉलेज, पुणे येथील फिरोदिया सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

विज्ञान शिक्षणाची गोडी निर्माण करत ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित करणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून ग्रामीण शाळांपर्यंत प्रत्यक्ष विज्ञान प्रयोग पोहोचविण्याची ही संकल्पना विशेष लक्षवेधी ठरली. या प्रयोगशाळेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांतील १०० हून अधिक प्रयोगांची सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांना ‘Learning by Doing’ पद्धतीने विज्ञान शिकण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि नवसंकल्पनांची आवड वाढण्यास मोठी मदत होत आहे.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली मुख्य पाहुण्या म्हणून योगिता आपटे उपस्थित होत्या. त्यांनी CSR क्षेत्रातील अनुभव मांडताना ग्रामीण शिक्षणात तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी यांची प्रभावी सांगड घालण्याची गरज अधोरेखित केली.मुख्य वक्ते म्हणून शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद व्ही. कुलकर्णी यांनी प्रयोगाधारित शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
विशेष अतिथी म्हणून डॉ. अमित राऊल, योगेश खळदकर उपस्थित होते तसेच रीट पुणे संस्थेचे अध्यक्ष विवेक ताटके यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक समृद्ध, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.

प्रास्ताविकात REAT च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,पुढील टप्प्यात हा विस्तारण्यात येणार असल्याचे सांगितले.
अधिवेशनादरम्यान “लॅब ऑन व्हील्स” व्हॅनचे मॉडेल सादर करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी अनुभवांचे कथन केले.. राज्यभरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपक्रमाचे कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जे. डी. पाटील आणि शिवप्रसाद नाटेकर यांनी अधिवेशनात सहभाग घेतला. त्यांनी हा उपक्रम ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

नियोजनबद्ध आयोजन, विज्ञाननिष्ठ उपक्रमांची प्रभावी मांडणी आणि प्रेरणादायी वातावरणामुळे हे अधिवेशन उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरले. ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात “लॅब ऑन व्हील्स” हा उपक्रम भविष्यात परिवर्तनाचा नवा अध्याय लिहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रीटा संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅब ऑन व्हील्सची यशस्वी सुरुवात केलेबद्दल राज्य आदर्श शिक्षक जे.डी.पाटील यांना शास्त्रज्ञ मिलिंद कुलकर्णी यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा