You are currently viewing नागवे येथे कवी तथा लेखक भाई तवटे यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

नागवे येथे कवी तथा लेखक भाई तवटे यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

कणकवली :

नागवे येथील वैश्य समाज प्रतिष्ठान नागवे, मुंबई संचालित नव्याने उभारण्यात आलेल्या वैश्य भवन इमारतीचा शुभारंभ तसेच कवी तथा लेखक श्री. दत्तात्रय उर्फ भाई तवटे लिखित “अंतर्मनातील स्मृतिगंध” या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, कविरसिक व आप्तमंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात श्री. विष्णू सातवसे, मोहन हुले, नाना शिरसाट, विनोद हुले, मंगेश सावंत, श्री. धाकू तनवडे सर, प्रगती बांदेकर तसेच भाई तवटे यांच्या पत्नी सौ. उर्मिला तवटे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी भाई तवटे यांच्या कवितांमधील संवेदनशीलता, ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि नातेसंबंधातील भावविश्व यांचे कौतुक केले.

यावेळी नागवे गावाच्या प्रथम नागरिक सौ. सिद्धीका जाधव या उपस्थित होत्या. तसेच भाई तवटे यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कवितांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला श्री. दिलीप ढवण, प्रकाश मोर्ये, सुशील मोर्ये, श्री. बंडू खोत, गजानन मोर्ये, मोहन मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र तवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा