You are currently viewing माजी सैनिक/ विधवा पत्नींनी शैक्ष‍णिक प्रकरणे  ऑनलाईन सादर करण्यासाठी वेबसाईट सुरु   

माजी सैनिक/ विधवा पत्नींनी शैक्ष‍णिक प्रकरणे  ऑनलाईन सादर करण्यासाठी वेबसाईट सुरु  

माजी सैनिक/ विधवा पत्नींनी शैक्ष‍णिक प्रकरणे  ऑनलाईन सादर करण्यासाठी वेबसाईट सुरु

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नींनी, सन 2025-26 ची शैक्ष‍णिक प्रकरणे के. एस. बी. (Kendriya Sainik Board)  या  पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची वेबसाईट  दिनांक 01 एप्रिल 2026 पासुन सुरू झाली आहे. पात्र माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नींनी  के. एस. बी. प्रकरणे ( जसे की  पाल्यांची  1 ली ते पदवी पर्यंतची (B.A., B. Com & BSc) शैक्ष‍णिक प्रकरणे, PM Scholarship, Penury Grant  व मुलीचा विवाह)  केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्धारीत वेळेतच सादर करावे, असे आवाहन सहायक सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

            माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नींनी अर्जात सर्व माहिती  केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली  यांनी दिलेल्या नमुन्यात पूर्ण भरावी. सर्व मुळ कागदपत्रे Upload करावी.  कोणत्याही प्रकारची Zerox  Upload करू नये. ऑनलाईन पध्दतीने स्वत:  Upload  करावी अथवा ज्या Net Cafe ला सदर बाबत माहिती आहे  किंवा त्यांनी यापूर्वी अशी प्रकरणे केलेली असल्यास त्यांच्याकडून प्रकरणे तयार करुन घ्यावीत.

            संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नींनी  ऑनलाईन पध्दतीने प्रकरण सादर केल्यानंतर के. एस. बी. या  पोर्टलवर वर Upload केलेला अर्ज घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हजर रहावे. येताना  Upload केलेल्या अर्जासोबत सर्व मुळ कागदपत्रे आणावीत. ( जसे की   Discharge Book, Identity Card, SPARSH PPO, Aadhar Card, Declaration Certificate, Bank Pass Book, Mark List).

                जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांच्या समोरच त्यांचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने  तपासून सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे पाठविण्यात येईल.             कोणत्याही परिस्थितीत मौखिकरित्या ‍किंवा दूरध्वनीव्दारे सदरची प्रकरणे तपासली जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी.  तसेच निर्धारीत वेळेत प्रकरणातील त्रुटींची पुर्तता न केल्यास किंवा प्रकरण रद्द झाल्यास लाभार्थी त्यास जबाबदार राहील यांचीही नोंद घ्यावी.

            पात्र माजी सैनिक /माजी सैनिक विधवा पत्नी यांनी  सदरबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास सहकार्य करुन या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362-228820 वर संपर्क  करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा