You are currently viewing जीवन

जीवन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जीवन*

 

(८+८+८+४) लवंगलता

 

मानवतेचा पथ सजवाया होवुनिया रांगोळी

माझ्यानंतर शिल्लक मागे या कवितेच्या ओळी

 

शब्दाविनही भाव समजती मौनामधल्या वेळी

दुःखास सदा दूर सारुनी भरू सुखाची झोळी

 

विश्वासाचा पूल बांधुनी देऊ मजेत टाळी

मानवतेचा धागा विणुया विणतात जसे कोळी

 

गरजूंनाही मदत करूया त्यांच्या संकट काळी

घडवू अद्दल स्वार्थांधांना दूर करुनिया टोळी

 

मूर्ख समजती ते लोकांना जनता नाही भोळी

भान असू द्या माणुसकीचे नकाच भाजू पोळी

 

आपुलकीचा गंध लेवुनी सजवू जीवनथाळी

हाती धरुनी हात करू या दुष्कर्मांची होळी

 

मनोमन जरा उजळू दे रे सोबतीने दिवाळी

माया ममतेच्या गाठींची बांधू आपण मोळी

 

 

डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा