*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी ज्योतिबा पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आस्था…!*
आस्था म्हणजे श्रद्धेचा दीप
अंतर्मनात सतत उजळणारा,
अंधारलेल्या वाटांमध्येही
मार्ग नव्याने दाखवणारा…!
आस्था म्हणजे निःशब्द प्रार्थना
हृदयातून उमटणारी भावना,
शब्दांपलीकडे जाऊनही
देवाशी जोडणारी साधना…!
आस्था म्हणजे विश्वासाची ताकद
जगण्याला देणारी उमेद,
अपयशाच्या सावलीतही
यशाची दाखवणारी वेद…!
आस्था म्हणजे प्रेमाचा स्पर्श
नात्यांत भरवणारा हर्ष,
मनामनांत जुळणारा धागा
जीवनाला देणारा अर्थ…!
आस्था म्हणजे शांततेचा श्वास
मनाला देणारी नवी आस,
विश्वासाच्या या आधारावर
सुंदर होतो प्रत्येक श्वास…!
स्वच्छंद पाखरू…!
जोतिबा पाटील,कांदबरी.
