सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने जन्मलेल्या एका दिवसाच्या बाळाला दिले जीवदान.
सावंतवाडी
सिंधुदुर्गातील सध्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असतानाचं काल सकाळी बरागडे दाम्पत्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले होते.
सिजर झाल्यामुळे बाळाच्या आईचे आरोग्य काहीसे खालावले होते परंतु नुकताच जन्मलेल्या बाळाला श्वास घेताना अडथळा निर्माण होऊ लागला त्यामुळे बाळाला तत्काळ व्हेंटिलेटरची आवश्यकता होती परंतु ही सुविधा आपल्या शासकीय रुग्णालयांमध्ये नसल्यामुळे तात्पुरतं त्या बाळाला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आले होते परंतु संध्याकाळपर्यंत बाळाची तब्येत खालावत गेली असता सदर खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टरने बाळाला तत्काळ गोवा बांबुळी येथे दाखल करण्याचा सल्ला दिला असता सदर बाळाच्या नातेवाईकांनी लगेच 108 रुग्णवाहिकेला संपर्क केला परंतु सर्व 108 रुग्णवाहिका व्यस्त होत्या
अशा अवस्थेत त्या बाळाचे नातेवाईक फार अस्वस्थ झाले व रडू लागले बाळाला तात्काळ गोवा बांबुळी येथे घेऊन जाणे गरजेचे होते अशावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला ते तत्काळ रुग्णालयात दाखल झाले आणि 108 चे मॅनेजिंग डिरेक्टर विनायक पाटील यांना फोन तत्काळ 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली असता त्यांनी ताबडतोब 108 रुग्णवाहिकेची ची व्यवस्था करून दिली पण दुर्दैव गोवा बांबुळी येथे बाळासाठी बेड उपलब्ध नसल्याचे समजतात त्या बाळाच्या नातेवाईकांच्या पायाखालची धूळ सरकली अशावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी डॉ. ऐवळे डॉ. सावंत व डॉ.खानोलकर यांची मदती घेऊन खाजगी हॉस्पिटल मधील सिस्टर स्वप्नाली दळवी हिला सोबत घेऊन सदर बाळाच्या नातेवाईकांच्या सल्ल्याने राणे हॉस्पिटल पडवे येथे तत्काळ दाखल केले तेथील डॉक्टरांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करून व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिलाअसता बाळाला जीवदान मिळाले हे ऐकून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना आनंद झाला तर बाळाच्या नातेवाईकांनी रवी जाधव व लक्ष्मण कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले. परंतु हॉस्पिटल यंत्रणेवर त्या बाळाच्या नातेवाईकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली.
