You are currently viewing जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

* !! जागतिक हास्य दिन !! *

 

आज जागतिक हास्य दिन… हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस सुदैवी… हास्य हे आपल्या आयुष्यातील प्रभावी औषध आहे..ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही… !!

हसणार्‍या चेहर्‍याभोवती मित्रमैत्रिणींची गर्दी तर होतेच पण एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो शिवाय हसतमुख चेहर्‍याच्या व्यक्ती कठीण प्रसंगांवरही सहज मात करत त्यातून मार्ग काढतात..

हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा घटक आपण जेवढा विकसित करू तेवढे आपले जीवन सुखी आणि आनंदी होईल..

स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी आनंद हाच त्यामागील भाव असतो..

जगातील कोणत्याही हसणार्‍या व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या असोत. कारण हास्य हा सर्वांचा समान धर्म आहे. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी आनंदास्त्र आहे नाही का?..

जागतिक हास्य दिनाच्या शुभेच्छा 🌹🌹

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे @

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा