*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्न पडले केव्हा*
न गुंतता मनामध्ये गुंतून मी गेले
अजूनही आठवते मला ते उन्हाळे पावसाळे
छत्री असून हातामध्ये मी चिंब चिंब भिजले
ओठास ओठ न टेकताही मी मोहरून गेले..
अधुराच स्पर्श तुझा किती वाजवितो वाळे
अजूनही आठवते मला ते उन्हाळे पावसाळे..!!१!!
ती ओली कुंतले तशीच पाझरत होती
ती पुसण्यास तेवढी वसने कोरडी गं नव्हती..
खरी प्रीत होती तुझी ते नव्हते गं चाळे
अजूनही आठवते मला ते उन्हाळे पावसाळे…!!२!
दिला तुने मला तेव्हा छातीचा उबारा
आला कळून तेव्हा अंगी गोड शहारा..
नको पुन्हा उधान प्रेमाला घातले मी आळे
अजूनही आठवते मला ते उन्हाळे पावसाळे..!!३!!
मी घट्ट मिठीत गेले होता चंद्र पहात तेव्हा
मी मलाच पुसत होते हे स्वप्न पडले केव्हा
काढत बसली प्रीतीची मी तुझ्या ठोकताळे..
अजूनही आठवते मला ते उन्हाळे पावसाळे..!!४!!
सौ परसोडकर पुसद..✍🏻
