You are currently viewing वामनराव महाडिक महाविद्यालयाचा बारावी निकाल ९७%; तिन्ही शाखांत मुलींची बाजी
Oplus_16908288

वामनराव महाडिक महाविद्यालयाचा बारावी निकाल ९७%; तिन्ही शाखांत मुलींची बाजी

कला शाखेत खुशी पानवाला, वाणिज्यात सांजल भोवड तर विज्ञानात चैताली तळेकर प्रथम

कणकवली / तळेरे (प्रतिनिधी):

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील विद्यार्थ्यांनी बारावी (एच.एस.सी.) २०२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७% लागला आहे.

यामध्ये कला शाखेचा निकाल ९१.००%, वाणिज्य शाखेचा १००% तर विज्ञान शाखेचाही १००% लागला आहे. वाणिज्य शाखेतील सांजल संदीप भोवड (४८५ गुण – ८०.८३%) हिने तिन्ही शाखांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी

कला शाखा:

खुशी प्रणव पानवाला – ३६६ गुण (६१%)

समिआ तारिक हुना – ३६० गुण (६०%)

वेदांत रघुनाथ तानवडे – ३३४ गुण (५५.६७%)

वाणिज्य शाखा:

सांजल संदीप भोवड – ४८५ गुण (८०.८३%)

समीक्षा संतोष पाटणकर – ४३० गुण (७१.६७%)

तनिष्का संदीप बांदिवडेकर – ३९८ गुण (६६.३३%)

विज्ञान शाखा:

चैताली प्रशांत तळेकर – ३७७ गुण (६२.८३%)

श्रावणी संदीप तळेकर – ३६९ गुण (६१.५०%)

निशांत विजय घाडी – ३६८ गुण (६१.३३%)

या यशस्वी विद्यार्थ्यांचे तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चिटणीस श्रीकृष्ण तुकाराम खटावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अरविंद महाडिक, सर्व समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा