You are currently viewing आज धावली डबल डेकर

आज धावली डबल डेकर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आज धावली डबल डेकर*

 

लाल परी ती डबल डेकर

ठाणे शहरी “पळू लागली”

स्वप्न उरीचे सत्यात आले

जनता सारी खूश जाहली

1

स्वागत करण्या बच्चे सारे

वरच्या सीट धरून बसले

बहावा धावला स्वागताला

हळद रंगाने रस्ते *न्हाले*

2

हौतात्म्य पत्करून वृक्षांनी

गुलमोहरानी सडे पसरले

बालकन्यांनी पाहून उजेड

महापालिकेचे ऋण मानले

3

घेतील परीक्षा रीक्षावाले

म्हणून पोटावर पाय आले

नव्हता धंदा अधीच फार

डबलडेकरचे धूड धावले

4

बोट दाखवून *परीकडे*

पोटात दुखणार रिक्षांचे

मराठी भाषेचे असून देणे

हसू मावळले वदनावरचे

5

क्रमांक बसचा देतो इशारा

छत्तीस पेक्षा *त्रेसट बरा*

वापर करु समजून आपली

फाडायची नाही सीट जरा

6

पैसे आपले निर्णय आपले

वापरू आपण जपून तिला

उन्हाळा आहे “महा प्रचंड”

मुहूर्त आहे छान निवडला

7

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मोबाईल/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा