*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. सरिता परसोडकर लिखित भारुड*
*जाऊ कशी कशी मी भजनाला*
अहो नेहमीच म्हणता सासूबाई
लिहून देते दोन चार ओळी
पेनच घेतला लिहायला हो…
जाऊ कशी कशी मी भजनाला..२ वेळा..हो
( अहो, माऊली सासुबाई भजन लिहायला बसल्या पण सिरीयल …
भजन लिहून झालेच नाही आणि भजनाची वेळ गेली)
दुसऱ्या गुरुवारला जाण्याची तयारी केली
ऑफिस मधून अचानक घरी स्वारी आली
नकार दिला जाण्याला हो..
जाऊ कशी कशी मी भजनाला
२.वेळा..हो..
तिसऱ्या गुरुवारी भजनाला जायच्या वेळेस बघ आता
सासुबाई म्हणाल्या..
अग भजनाचे दूर आहे घर
ऊन्हाची झाली दुपार
छत्री आणते तुला न्यायाला हो..
जाऊ कशी कशी मी भजनाला
२वेळा….हो..
(छत्री आणायला निघाल्या परंतु रस्त्यात मैत्रिणी भेटल्या…
हिरवीगार भाजी त्यामध्ये छत्री विसरून गेल्या)
(अखेर योग जुळला बरं का
झाले आता या गुरुवारी नक्की निघाले …
साडी घालून भजनाची बॅग हातात घेतली..)
लगेच तितक्यात फोन वाजला बाई
मोलकरीण म्हणे दोन दिवस येणार नाही
पदर खोचून लागली बाई कामाला..
जाऊ कशी कशी मी भजनाला हो जाऊ कशी कशी मी भजनाला.,,,हो..
म्हणून सांगते तुम्हाला ऐका
पुरे झाला आता तुमचा हेका
आत्ताच लागा प्रभू चरणाला
हो म्हणून मी जाते भजनाला… म्हणून मी जाते भजनाला हो
सरिता म्हणे शरण मी आले
मन माझे कृतार्थ झाले
लागले परमार्थ करायला
हो ..म्हणून मी जाते भजनाला म्हणून मी जाते भजनाला हो
सौ सरिता परसोडकर पुसद
