*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*_🍃🌼गंधाळलेली मुकी सकाळ.🪶_*🍃💦
नको पाहू तू वळून मागे
गंधाळलेली मुकी सकाळ
सोडून मोकळे केस कुरुळे
पाहून होतो मी घायाळ…….
1
सळसळणारे यौवन तुझे
खिळवून ठेवते जागेवरती
अजून नाही उठली उषा
चाचपडते ती स्वत:भोवती…
2
चुकार किरणे चुंबून जाती
तुज गालाची *खळी खुळी*
कसा रहाणार स्वस्थ बसून
उधळून लावीन *मी खेळी*…
3
नको पाहूस तू वळून मागे
टक्कर होईल *श्वानाशी*
धक्का लागुन पडशील खाली
घट्ट *धरीन “मी” हृदयाशी*….
4
नाही कळले धुके समोरचे
नकळत लागेल ठेच तुला
पाणी येईल नयनी माझ्या
कसा सावरू *सांग मला*
5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मोबाईल /9324324157
