You are currently viewing उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना

उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना

उष्माघात  उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना

सिंधुदुर्गनगरी 

सर्वसाधारण प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे या महिन्यामध्ये तापमानात वाढ झाल्याने उष्माघात संभवतो, उष्माघाताची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

उष्माघाताच्या अनुषंगाने खालील प्रमाणे जाहीर आवाहन प्रसिद्ध करण्यात येत आहे. अति जोखमीचे घटक:-१)६५वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती,१ वर्षाखालील व १ते ५ वयोगटातील मूले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलिक व्यक्ती, अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणारे व्यक्ती. उष्माघात होण्याची कारणे:- १) उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, २) कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे काच कारखान्यातील कामे करणे,३) जास्त तापमानाच्या  खोलीमध्ये काम करणे,४)घट्ट कपड्यांचा वापर करणे,अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थिती सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे :-१)थकवा येणे ,ताप येणे, त्वचा कोरडी पडणे २) भूक न लागणे ,चक्कर येणे, निरुत्साही होणे ,डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे,३) रक्तदाब वाढणे,मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था  इत्यादी.

प्रतिबंधात्मक  उपाय :- १) वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे,२) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमाना असताना करावित.३)उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सेल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे. ४) जलसंजीवनीचा वापर करावा,भरपूर पाणी प्यावे,५) सरबत प्यावे. ६) अधून मधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.७)  वरील लक्षणे सुरू होतात ताबडतोब उन्हात काम करणे थांबवणे उपचार सुरू करावा.  ८)उन्हात बाहेर जाताना गॉगल्स ,डोक्यावर टोपी, टॉवेल,फेटा,उपरण यांचा वापर करावा.

उपचार :- रुग्णास वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा  हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. २)रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.३)  रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.४)  रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत, ५)आवश्यकतेनुसार  सलाईने देणे.

आरोग्य विभागामार्फत केलेल्या उपाययोजना :-१) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत.२) उष्माघाताच्या रुग्णांना उपचारासाठी जलद प्रतिसाद टीम तयार करण्यात आलेली आहे.३)प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरही असताना उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.४) सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा अद्याप एकही रुग्ण सापडलेला नसून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये याबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे.५)याकरिता जिल्हातील सर्वच आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस, नॉर्मल सलाईन इत्यादी अत्यावश्यक औषधांचा पुरेसा  औषध साठा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार इतर साहित्याचा पुरवठा जिल्हास्तरावरुन सर्वच आरोग्य संस्थांना करण्यात येतो.६) सर्वच आरोग्य संस्थाकडील रुग्णवाहिका सुस्थितीत कार्यरत असून १०८ सेवेच्या रुग्णवाहिका देखील उपलब्ध आहेत.७)उष्माघातासंबंधी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावरून अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नियमितपणे आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

वरील प्रमाणे उष्माघाताची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साठण्यात यावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा