You are currently viewing राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील न्यायप्रक्रियेला गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना जलदव  परवडणाऱ्या पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांचे निर्देशान्वयेजिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षतथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली  शनिवारदि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे.

 या वर्षातील ही दुसरी लोक अदालत असूनया लोकअदालतीतून विविध प्रकारची तडजोडपात्र प्रकरणे एकाच दिवशी सामोपचाराने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार असूननागरिकांना दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळणार आहे. सध्या अनेक प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असूनत्यांचा निकाल लागण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे. अशा परिस्थितीत लोक अदालत ही नागरिकांसाठी एक प्रभावी पर्याय ठरत आहे. येथे वाद परस्पर संमतीने सोडवले जात असल्यामुळे दोन्ही पक्षांना समाधानकारक तोडगा मिळतो. दीर्घकाळ चालणाऱ्या खटल्यांमुळे होणारा मानसिक ताणवेळेचा अपव्यय आणि आर्थिक भार यापासून मुक्तता मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.

या लोक अदालतीत जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणेकौटुंबिक व वैवाहिक वादमोटार अपघात दावा प्रकरणेभूसंपादन व महसुली प्रकरणेधनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणेतसेच वीज बिलपाणीपट्टी देयके यांसारखी प्रकरणे हाताळली जाणार आहेत. याशिवाय बँकावित्तीय संस्था व विमा कंपन्यांची तडजोडीस पात्र प्रकरणे तसेच दाखलपूर्व स्वरूपातील वाद देखील या लोक अदालतीत सोडवले जाणार आहेत.

लोक अदालतीची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि अनौपचारिक असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही कोणत्याही अडचणीशिवाय सहभाग घेता येतो. पारंपरिक न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा दीर्घ कालावधीसाक्षी-पुरावेयुक्तिवाद यासारख्या गुंतागुंतीच्या बाबी टाळल्या जातात. त्यामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळवणे शक्य होते.

लोक अदालतीत दिलेले निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतात. त्यामुळे निकालानंतर पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेची गरज भासत नाही. तसेच प्रकरण निकाली निघाल्यास भरलेले न्यायालयीन शुल्क नियमांनुसार परत मिळण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासाही मिळतो.

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना न्याय सुलभ व परवडणाऱ्या पद्धतीने मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अनेकदा अशा भागातील नागरिकांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे किंवा खर्चाच्या भीतीमुळे न्याय मिळवण्यापासून दूर राहावे लागते. लोक अदालत ही त्यांच्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरते. दीर्घकाळ प्रलंबित वादातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि जलद न्यायासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकशासकीय विभागबँकावित्तीय संस्थाविमा कंपन्या तसेच संबंधित पक्षकार यांनी आपल्या तडजोडीस पात्र प्रकरणांचा आढावा घेऊन या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावाप्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावातर दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा तसेच लोक अदालतीच्या माध्यमातून वाद मिटवून वेळपैसा आणि मानसिक ताण यांची बचत करण्याची ही एक महत्त्वाची संधी असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव  संपूर्णा गुंडेवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा