You are currently viewing भूपाळी रामाची

भूपाळी रामाची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भूपाळी रामाची*

 

 

कुठे हरवली सांग श्रीरामा ,नील अभ्रकाची उशी.

हलके हलके जाग आता, वळ थोडा वामकुशी..!!!!

 

 

मध्यरात्रिचा बघ अजून, प्रहर लोटला नाही

किती आतुर स्वागता तुझ्या, दिशा झाल्या दाही

चांदण्याचे झुंबर बघ ,कसे हलते आकाशी..

 

हलके ,हलके जाग आता, वळ थोडा वामकुशी..!!१!!

 

प्रभा फाकली बघ किती ,सोनेरी किरणांनी

पहाट वारा घेऊन आला, सुगंध चोर पावलांनी

गोधन सजली तुझ्या स्वागता, घालुनी कनक ठुशी..

 

हलके हलके जाग आता, थोडा वळ वामकुशी.!!२!!

 

उघड आता राजीवनेत्र, कलियुगी नराधम माजले

त्रिभुवनकारक कौशल्या सुत, नाम तुझे गाजले

पुन्हा घे अवतार या भूवरी, होईल आम्हा खुषी..

 

हलके हलके जाग आता ,थोडा

वळ वाम कुक्षी..!!३!!

 

दशरथनंदन की कौसल्यासुत, मी कोण्या नामे आळवू

तुझ्या नामाची ती भक्ती माला, सांग कशी माळू

मज वाटे पांघरावी शाल ,काढून वैराग्य नक्षी

 

हलके हलके जाग आता, वळ थोडा वामकुशी..!!४!!

 

 

सौ सरीता परसोडकर✍🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा