You are currently viewing ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी

‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी

वैभववाडी:

‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत गायीला “राष्ट्रमाता” घोषित करण्यात यावे, गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी तसेच गायींच्या पालनपोषणासाठी शासनाने अनुदान योजना सर्व शेतकऱ्यांना लागू करावी केंद्रीय गोसेवा मंत्रालय स्थापित व्हावे अशी मागणी करत तहसीलदार श्री सूर्यकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडेही पाठवण्यात आल्या आहेत.

यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा संसारे, गोप्रचारक गव्यसिद्ध श्री महेश संसारे, भाजपा कार्यकर्ते अनंत फोंडके, जयवंत पळसुले, परब सर, प्रफुल्ल पवार, निलय शेरे, प्रफुल्ल रावराणे आदी उपस्थित होते.

उपस्थितांनी गायीचे धार्मिक,पर्यावरणीय, आरोग्य, नैसर्गिक शेती, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी गायींच्या संगोपनासाठी आर्थिक मदत देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. शासनाने यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा