You are currently viewing नवी मुंबईत सुरुचि जैन वधु – वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबईत सुरुचि जैन वधु – वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

पेठ वडगांव / प्रतिनिधी :

नवी मुंबई एरोली येथे सुरुचि सकल जैन वधु – वर सुचक मंडळाच्या वतीने २१ वा जैन वधु – वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास साहित्यिका सौ.मेघा उळागड्डे, उद्योगपती शितल नरदेकर, समाजसेविका श्रीमती सुरेखा शंकरगौडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुंबई शहरासह महाराष्ट्र आणि विविध राज्यातील उमेदवार व त्यांच्या पालकांनी एकमेकांचा सविस्तर परिचय देत मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी प्रमुख पाहुण्या सौ.मेघा उळागड्डे, श्रीमती सुरेखा शंकरगौडा, उद्योगपती शितल नरदेकर, मेळाव्याच्या संयोजिका सौ.सुप्रिया पाटील, सचिन पाटील आदींनी आपल्या मनोगतात आजच्या काळात चांगला जोडीदार निवडणे आणि सुरक्षित वैवाहिक जीवनासाठी वधु -वर परिचय मेळाव्याची गरज विषद करुन त्यासाठी सुरुचि जैन वधु वर सूचक मंडळ करत असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वधु वर परिचय मेळाव्यातून वेळ, पैसा वाचून चांगला जोडीदार निवडणे शक्य होत असल्याचे सांगून यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असलेल्या पेठवडगावच्या सुरुचि सकल जैन वधु वर मंडळाच्या सौ.सुप्रिया पाटील, सचिन पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

तत्पूर्वी, या मेळाव्यात धीरज आगरकर, सौ.वृषाली आगरकर यांनी इच्छूक वधु -वरांचा योग्य पध्दतीने परिचय करुन देत उपस्थितांची मने जिंकली. या मेळाव्यास सामाजिक कार्यकर्ते सुनिल लोखंडे, सौ.चैताली जुजारे, तेजस जुजारी, मुख्याध्यापिका सौ‌.वैशाली संकपाळ, सौ.तेजश्री भक्ते यांच्यासह विविध मान्यवर, महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातील उमेदवार, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन सुरेखा अष्टेकर यांनी केले. एकदंरीत, या मेळाव्यास उमेदवार आणि त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा