*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच..माझं जगणं..!!*
जाणिवांच्या प्रतिबिंबाचा खेळ
कॅमेर्यासोबत खेळत असतो
चैतन्याचा आधार घेत- घेत
माझ्याचं..विश्वात दंग राहतो..
शाप ..शपथ..वरदान
स्वतःलाच प्रतिबिंबातून देतो
जाणिवांचा बुडबुडा फुटेस्तोवर
व्यक्तीमत्वाला आजमावून पाहतो
ऋतूना..चुकवत..चकवत..
आजही हिरवागार राहिलो
वयाला..फसवत..चोरतं
कॅमे-याचा गुलाम झालो..
शाळेच्या बाकावर आजही
ती …माझी वाट पाहते..
आजही प्रेयसी स्वप्नांत येते
पण ती म्हातारी दिसते..
दरवर्षीच्या जत्रेने.. देव
कधीच..म्हातारा होत नाही
अरे..मीच तुझा..देव ..तुला
म्हातारा..होऊ देणार नाही..
बघ..आजही तुला शुभ्र
प्रकाश ..पिता येतो
आईने जपलेल्या केसांचा
भांग..तुला पाडता येतो..!!!
अन् मला तू बेस्ट पोज देतो ..
अजून काय हवं…
बाबा ठाकूर
