साळगाव महाविद्यालयाचा गौरवशाली क्षण..!
📍 कुडाळ | २२ एप्रिल
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगावचा माजी विद्यार्थी, उत्कृष्ट क्रीडापटू व मराठी विभागातून पदवी प्राप्त केलेलाअक्षय मोर्ये यांची कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात यशस्वी निवड झाली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक अधिक वाढला असून, तरुणांसमोर त्यांनी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांचे मार्गदर्शन तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी संस्था, पदाधिकारी आणि प्राध्यापकांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, झाराप पंचक्रोशीचे अध्यक्ष मा. श्री. मुकुंद धुरी, संस्था सचिव मा. श्री. प्रदीप तेंडोलकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
🎖️ देशसेवेसाठी निवड झालेल्या या वीर जवानास मनःपूर्वक शुभेच्छा!
🚩 जय हिंद! 🚩
