You are currently viewing गडकरींचा दौरा टोलसाठीच? ओसरगाव टोलविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा

गडकरींचा दौरा टोलसाठीच? ओसरगाव टोलविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा

गडकरींचा दौरा टोलसाठीच? ओसरगाव टोलविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा

वैभव नाईकांचा गौप्यस्फोट; “महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल नको” – सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

कणकवली

राणेंच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचा सिंधुदुर्ग दौरा झाला असला तरी हा दौरा प्रत्यक्षात ओसरगाव टोल नाका सुरू करण्यासाठीच होता, असा आरोप माजी आमदार Vaibhav Naik यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यात टोलविषयक वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
कणकवलीतील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक म्हणाले की, गडकरी यांनी दौऱ्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण राहिल्याबद्दल माफी मागत मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र दुसरीकडे टोल नाका सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ एप्रिल रोजी टोल वसुलीसाठी निविदा मागविण्यात आल्या असून २४ एप्रिल रोजी त्या उघडून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे.
नाईक यांनी दावा केला की, गडकरी यांच्या दौऱ्यानंतर टोल सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून सत्ताधारी नेत्यांशी संबंधित एजन्सीकडून टोल वसुलीच्या पार्श्वभूमीवर गुप्त सर्वेक्षण देखील सुरू आहे.
“मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय ओसरगाव टोल नाका सुरू करू नये,” अशी आमची ठाम भूमिका आहे. महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून किमान एक ते दीड वर्ष लागणार आहे. तोपर्यंत टोल वसुली सुरू करणे अन्यायकारक ठरेल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
तसेच, टोलविरोधात पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देत त्यांनी व्यापारी संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. “टोल ठेका घेणारी कंपनी सत्ताधाऱ्यांशी संबंधित असल्याने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो; मात्र आम्ही टोल सुरू होऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा