जिल्हास्तरावर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
क्रीडा प्रतिभा विकास प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडूंची निवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरावर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी होणाऱ्या निवडचाचणीत सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने क्रीडा विभाग व क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके संपादन करून ऑलिंपिक, आशियाई कॉमनवेल्थ इत्यादी स्पर्धा मध्ये भारताचे व राज्याचे नाव उज्वल करणे या उद्देशाने मिशन लक्षवेधी महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रकरिता सध्य स्थितीत अथलेटिक्स या खेळाचे अनिवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
तरी ईच्छुक खेळाडूंनी https://docs.google.com/forms/
