सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाचा समाजोपयोगी उपक्रम
पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड सेवेची सुरुवात केली आहे .जवळच्या एसटी बस स्थानकात हे कार्ड काढता येते. कार्ड काढण्यासाठी प्रत्येक बस स्थानकात, ऑफिसला ज्येष्ठ नागरिक, महिलांना जाणे- येणे ,रांगेत उभे राहणे या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो .सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाने अधिकृत एजंटशी संपर्क साधून आपल्या संघाचे सभासद तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला यांना विरंगुळा केंद्र, आदर्श नगर ,किवळे -रावेत या ठिकाणी कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .या सुविधेचा आतापर्यंत सुमारे 275 जेष्ठ नागरिक व महिलांनी लाभ घेतला आहे .सदर सुविधा उपलब्ध करून देणारा पिंपरी चिंचवड शहराचा सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघ हा प्रथम संघ ठरला आहे .संघाने राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ज्येष्ठांनी ,महिलांनी संघाने दिलेल्या सेवेबद्दल संघाचे आभार व्यक्त केल्याचे खजिनदार प्रकाश सावंत यांनी सांगितले .
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ,सुदाम दिवटे म्हणाले की ज्येष्ठ नागरिक संघामध्ये दरवर्षी आरोग्य शिबिर घेतले जाते सर्व सभासदांचे वाढदिवस दर महिन्याला करून त्या त्या दिवशी मनोरंजन म्हणून प्रत्येक सभासद कविता ,भारुड ,गौळणी ,भावगीते सादर करतात प्रत्येक नागरिक या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात,सचिव सुरेश बडगुजर म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीचे भारतात आयोजन केले जाते. योगाचे क्लासेस दोन बॅचमध्ये दररोज होत असतात भजन दररोज संध्याकाळी पाच दिवस आठवड्यातून होत असतात.
यावेळी संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे ,उपाध्यक्ष साहेबराव पाटील,सचिव सुरेश बडगुजर, खजिनदार प्रकाश सावंत,सहखजिनदार किशोर गायकवाड, सहसचिव तुकाराम कोरडे, संचालक रंजनाताई सस्ते धोंडीराम पाटील रवींद्र मोरे, इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
