You are currently viewing देवगड येथे २४ एप्रिलला रोजगार मेळाव्याचे आयोजन  

देवगड येथे २४ एप्रिलला रोजगार मेळाव्याचे आयोजन  

देवगड येथे २४ एप्रिलला रोजगार मेळाव्याचे आयोजन  

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रसिंधुदुर्ग व देवगड महाविद्यालयदेवगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळत देवगड महाविद्यालय देवगड येथे भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  यांनी दिली आहे.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार असूनविविध नामांकित कंपन्यांचा सहभाग यामध्ये असणार आहे. सुमारे ६०० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या मेळाव्यात अधिराज मेनपावर मार्फत Skoda Auto Volkswagen India, Atomberg Technologies, Excel Autocomp Industries Pvt. Ltd., Mahindra & Mahindra तसेच IAC International Automotive India या नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. १०वी१२वीआयटीआयडिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांमध्ये भरती केली जाणार आहे.

मुंबईपुणे तसेच इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याकडे कल असल्याने त्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहताना आपला बायोडाटा (Resume) तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रेओळखपत्र आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीतअसे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यास चालना मिळणार असून उद्योगांना योग्य मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

या रोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रसिंधुदुर्ग यांच्या सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा