You are currently viewing राजवाडा येथे जांभळाच्या सालीवर घसरून लॉरेन डिसोजा गंभीर जखमी

राजवाडा येथे जांभळाच्या सालीवर घसरून लॉरेन डिसोजा गंभीर जखमी

राजवाडा येथे जांभळाच्या सालीवर घसरून लॉरेन डिसोजा गंभीर जखमी

नगरसेवक सुधीर अरिवडेकर यांनी घेतली धाव.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सकाळीच सोशल मीडिया व वर्तमानपत्र माध्यमांना या सदर दुर्घटने संदर्भात अगोदरच सूचना केली होती. काल सायंकाळी अशाच पावसात चार अपघात घडले आणि आजच्या सायंकाळच्या पावसात सहा वाजता राजवाडा येथे जांभळाच्या झाडाखाली पडलेल्या जांभळावर घसरून लॉरेन डिसोझा हे गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला चार टाके पडले तर हात पाय खर्चटून गेले यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक सुधीर आरीवडेकर व तेथील नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन त्यांना सहकार्य केले.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन नगरपरिषेने तत्काळ जांभळांच्या झाडाखालील पडलेली जांभळं स्प्रे ने पाणी मारून साफ करावी अशी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी विनंती केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा