You are currently viewing अक्षय तृतीया
Oplus_16908288

अक्षय तृतीया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अक्षय तृतीया* 

 

साडेतीन मुहूर्ताच्या

सण अक्षय तृतीया

स्वर्गी गेले पितरांना

आज स्मरण करु या

 

पुण्यकर्म वैशाखात

त्रेता युगाचा आरंभ

शुभ कार्याला करु या

आज दिनाला प्रारंभ

 

वाडवाडीलांची पुजा

आमरसालाच मान

करू मंगल आरती

सत्कार्याचा सन्मान

 

लेक येई माहेराला

सखी संगती रानात

एकमेका सांगती गुज

मैत्रिनीच्याच कानात

 

गाती गौराईच गान

झोका बांधला झाडाला

माहेराच गाती गुण

भिडे ऊंच अभालाला

 

*शीला पाटील चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा