You are currently viewing फेरफटका

फेरफटका

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फेरफटका*

*****

संध्याकाळी बागेत जावे

मोकळ्या हवेत फिरावे

 

आजूबाजूला गर्दी किती

एकटेपणाची नको भीती

 

तलावात कासव छोटे

पहाती त्यास छोटे मोठे

 

रंगीबिरंगी मासे किती

पाण्यात झकास पोहती

 

कुणी खेळे, कुणी फिरते

आजी आबांचे लक्ष असते

 

मस्ती करून पोरं थकतात

भेळपुरीचा फडशा पाडतात

 

गोष्टी खूप नवीन शिकाव्या

आठवणी लिहून काढाव्या

————————– ———-

कवी अरुण वि.देशपांडे

९८५०१७७३४२

——- — ———— —– –

प्रतिक्रिया व्यक्त करा