भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा सत्कार.
सावंतवाडी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीची निमित्त. सावंतवाडी समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाप्रसंगी समाजामध्ये जागृत राहून सामाजिक कार्य करणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याचा गौरव पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव यांच्या हस्ते त्यांचा शॉल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश चव्हाण,उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव उपस्थित होते.
