You are currently viewing भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंचेऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने 16 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे:- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, महाविद्यालयातील इ.11 वी 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील.

तरी गरजू विद्यार्थ्यांनी सन 2023-24 वर्षांमध्ये स्वाधारसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी तसेच चालू वर्षात 2024-25 मध्ये प्रवेश मिळवलेले फक्त प्रथम वर्षाचे विद्यार्थी नवीन स्वाधारसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची PDF व शैक्षणिक आवश्यक कागदपत्रांसह दि.16 डिसेंबर 2024 अखेर पर्यत नजीकच्या मुलांचे/ मुलींचे शासकीय वसतिगृह/ महाविद्यालय व सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, येथे समक्ष/टपालव्दारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत.

संबंधित महाविदयालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विदयार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करणेत यावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२-२२८८८२) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा