कायद्या करणाऱ्या पेक्षा कायदा राबवणारा श्रेष्ठ संविधान अभ्यासक प्रा. केरनाथ ढवळे
संत तुकाराम नगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त त्यांनी केलेल्या कार्याची माहिती घेऊन जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. शिवाजीराव शिर्के म्हणाले की, दलितांच्या उद्धारासाठी शिका,संघर्ष करा,संघटित व्हा ,हा मूलमंत्र त्यांनी दिला.स्पष्ट विचार,सत्यनिष्ठा ज्ञानोपासना,सद्भावना अशा गुणांची खान त्यांच्याकडे होती, महाड येथील चवदार पाण्याच्या तळ्यावर पाणी भरण्यासाठी सत्याग्रह केल्याचे शिर्के यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले कि जगात बाबासाहेबांची 154 देशात जयंती साजरी होते हे भूषणावह आहेच, त्यांनी 395 कलमाचे संविधान 2 वर्षे 11 महिने आणि 7 दिवसात पूर्ण केले आहे,संविधानाचे महत्त्व व त्यांच्या शकांचे निरसन संसदेच्या प्रत्येक सदस्याचे त्यांनी केले. संविधानाचे एखादे कलम रद्द करण्याचे अधिकार संसदेला नसून ते सर्वोच्च न्यायालयाला असल्याचे त्यांनी संविधानात नमूद केल्याचे जोगदंड यांनी सांगितले .
संविधान अभ्यासक प्रा. केरनाथ ढवळे म्हणाले की कोलंबिया विद्यापीठाने सर्वात हुशार विद्यार्थी कोण यासाठी 300 वर्षात जे जे विद्यार्थी विद्यापीठातून पदवी घेऊन गेले या सर्वांची माहिती घेऊन सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून “नॉलेज ऑफ सिम्बॉल” ही पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देऊन जगातील सर्वात विद्यार्थी हुशार म्हणून त्याचा नावलौकिक केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आज भारतातील स्त्रिया पंतप्रधान राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
केंद्र संचालक आनिल कारळे यांनी शासनाच्या कामगाराप्रती असणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन सूत्रसंचालन केले तर आभार सुरेखा मोरे यांनी मांनले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के ,प्रमुख पाहुणे मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, संविधान अभ्यासक केरनाथ ढवळे. केंद्र संचालक अनिल कारळे गुणवंत कामगार संगीता जोगदंड, सुरेखा मोरे ,सा. का. पंडित वनसकर, चारुशीला ननवरे ,संगीता क्षीरसागर,प्रतिमा मरळ इत्यादी उपस्थित होते.
