*वेंगुर्ला आगारातून शिरोडा वेंगुर्ला बोरिवली बस फेरी सुरु*
वेंगुर्ले
बुधवार दिनांक १५/०४/२०२६ रोजी पासून शिरोडा वेंगुर्ला बोरिवली बस फेरी सुरू करण्यात आली असून, शिरोडा वरून सायंकाळी ठिक ४.३० वाजता आणि वेंगुर्ला वरून सायंकाळी ठिक ५.०० वाजता सदर बस सोडण्यात येईल, तसेच ही बस बोरिवली वरून सायंकाळी ७.०० वाजता सोडण्यात येईल,
गेले कित्येक दिवस फेरी सुरू करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदरे विकास मंत्री मा. श्री नितेशजी राणे साहेब यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला होता, सदर प्रश्नाबाबत तात्काळ दखल घेत, सदर बस फेरी सुरू करण्यात यावी अश्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाने सदर बस फेरी सोडण्याचे मान्य केले,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष मा. श्री संदेशजी सावंत साहेब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आगार अध्यक्ष श्री बाळू देसाई साहेब, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तथा आगार कार्याध्यक्ष श्री पप्पू परब साहेब, जिल्हा परिषद सदस्य श्री प्रितेश राऊळ साहेब, जिल्हा परिषद सदस्य श्री सुदन कवठणकर साहेब, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोकजी राणे साहेब , सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव श्री भरत चव्हाण यांच्या पाठपुराव्याने सदर बस फेरी सुरू करण्यात आली, वेंगुर्ला आगार सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघा तर्फे तसेच सर्व कर्मचाऱ्यानं तर्फे पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले, सर्व कर्मचाऱ्यांनी सदर बस फेरी कायमस्वरूपी सुरू रहावी तसेच वेंगुर्ला तालुक्यातील प्रवाश्यांना सुरक्षित व आरामदायी सेवा देण्याचे मान्य करण्यात आले.
