You are currently viewing धर्म आणि धर्माचा विपर्यास

धर्म आणि धर्माचा विपर्यास

*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*

 

*धर्म आणि धर्माचा विपर्यास*

 

 

मित्रांनो धर्म ही आफूची गोळी आहे, जो प्राशन करेल तो झिंगल्याशिवाय राहणार नाही. अशी म्हण प्रचलित आहे.

खरा धर्म नेमका काय असतो? आणि धर्माचा जेव्हा विपर्यास होतो तेव्हा,धर्म कसा चालतो.दोन्ही गोष्टीचं आपण इथे थोडसं चिंतन करणार आहोत.

पहिल्यांदा मानवी मूल्य जतन करणारा धर्म म्हणजे काय? ते आपण पाहणार आहोत आणि धर्माचा विपर्यास करणारे लोक जेव्हा अवगुणी वागायला लागतील तेव्हा धर्माचं नेमकं काय होतं. ते आपण समजून घेनार आहोत.

मानवी विकासाचा विचारचा धर्म या अर्थाने आपण धर्माकडे पाहणार आहोत.

*धर्म म्हणजे सत्कार्य होय*

दुसऱ्यांची तहान भूक ओळखणे म्हणजे धर्म होय. इथली सृष्टी सुंदर दिसायला पाहिजे म्हणून केलेलं कार्य म्हणजे धर्म होय.दुसऱ्यांना सर्वतोपरी केलेली मदत म्हणजे धर्म होय.समाजाच्या निसर्गाच्या,देशाच्या विरोधात आलेल्या संकटांना समर्थपणे तोंड देणे म्हणजे धर्म होय.अन्नदान,वस्त्रदान,विचार दान,दुसऱ्यांच्या अडचणीमध्ये जे जे सढळ हाताने मदत करतो तो धर्म होय.

धर्माला रंग नसतो.धर्माला रूप नसतं.धर्माला स्वरूप सुद्धा नसतं.तर, धर्माला सत्कार्यातुन निर्माण झालेल्या सद्भावनेचा विचार असते.

धर्माला विचार असतो. आचरण असतं तर धर्माला सदगुणांची मांदियाळी असते.धर्माला सत्कार्याची सोनेरी झालर असते.धर्माला परोपकाराचं सौंदर्य असतं.त्यालाच धर्म असे म्हणतात.

खरा मानवी धर्म जागतिक शांततेचा,सौधार्याचा,परोपकरायचा आणि ज्या मातृभूमीमध्ये आपला जन्म झाला ती मात्र भूमी संरक्षण करण्याचा आणि मातृभूमी मध्ये सौंदर्य फुलविण्याचा यातूनच सर्व जीवांची भूक भागविले जाते. निसर्गातल्या सर्व जिवांना संरक्षण केलं जातं.सांभाळ केला जातो. त्याची वाढ होण्यासाठी मदत केली जाते. प्राणी,पक्षी, वनस्पती या सर्व गोष्टी यामध्ये येतात.

जसे पृथ्वीवरती सप्तरंग आहेत ते सर्वांसाठी प्रेरणा देतात.चैतन्य देतात, शक्ती देतात,ऊर्जा देतात. विचार देतात.तसा तो सर्वगुणी बहुआयामी कार्याने सांधलेला तो म्हणजे धर्म होय.

आता आपण एवढ्या चांगल्या धर्माचा विपर्यास कधी होतो.ते आपण समजून घेणार आहोत.

विचाराची सुसंगती समाप्त होते. अवगुणांचा विकार जडायला लागतो. धर्मगुरूंच्या अंगी शडविकार निर्माण होतात.स्वतःला धर्मचालकच म्हणवणारे लोक जेव्हा अवगुनांची उधळण करायला लागतात.सत्कार्य सोडून चांगले विचार पायदळी तुडवून विकृतीच्या विचारातून ते चालत असतात.तेव्हा धर्माचा विपर्यास होतो.धर्माची पीछेहाट होते.लोक भयभीत होतात.लोक त्या धर्म निष्ठेपासून दूर जायला लागतात.लोक धर्म बदलतात.रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेंव्हा मूळ धर्म समाप्त होतो.आणि अवगुणांच्या विचारातून कुटील नीतीचा वापर करतात. वर्तन करतात.यातूनच खऱ्या धर्माची विटंबना होते.विचाराचं अस्खलन होतं.तेंव्हा मानवी मूल्याची राख रांगोळी होते.यातूनच खऱ्या धर्माचा त्या कार्याचा नायनाट होतो.

आता आपण विचार करणार आहोत आपण ज्या देशात राहतो, तिथल्या धर्म विचाराची विचारधारा विकासाकडे चाललेली आहे की, लयाकडे चालली आहे. जर विकासाची वाटचाल चाललेली आहे असे आपणास वाटत असेल तर तो प्रवाह मोठा करा आणि जर अधोगतीकडे चाललेली असेल तर त्या धर्मनीतीला रोखता आलं पाहिजे.थांबवता आलं पाहिजे. आणि विचार बदलण्यासाठी आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. चिंतन तर मला तुम्हाला आपल्या सर्वांनाच करावं लागेल. 22 व्या शतकातील भारतीयांचा धर्म जगावर राज्य करेल असा निर्माण करण्याची इच्छा आपल्यात आहे काय?आणि त्याप्रमाणे आपण सदगुणांचा विकास करणार आहोत काय? चिंतन तर आपल्या सर्वांना कराचं आहे..

 

*चिंतन:- भूमिपुत्र वाघ*

. 9172972482

प्रतिक्रिया व्यक्त करा