*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुरांची मलिका…आशा भोसले*
सुरांची ती मलिक स्वरांची ती राणी
गाण्याच्या जगात फक्त तिचीच एक कहाणी
कधी लाजरी कधी खट्याळ
कधी विरहात हरवलेली
प्रत्येक भावनेतून ती सुरांनी रंगवलेली
लावण्यांची लय ठुमक्यांची चाल
तिच्या आवाजात दडलेला स्वरांचा ताल
कधी “पिय…. तू”….चा नखरा गोड
तर कधी “दिल चीज क्या है” मधल्या
विरहाची ओढ….
सप्त सुरांच्या सरगम मध्ये
तिचं प्रत्येक गाणं होतं आरस्पानी
हसवणारी रडवणारी स्वप्न रंगवणारी
ती होती सुर आणि स्वरांची स्वरसम्राज्ञी
वय गेलं पुढे पण आवाज तरूणच राहिला
काळाला ही तिच्या सुरांनी गाऊन पाहिला
प्रेम,वेदना,आनंद,प्रत्येक रंग जपले
तिच्या गाण्यांनी तिचं आयुष्य अधिक सुंदर केले
अशा….
ही स्वरांची एक अमर कहाणी
मनामनात बसलेली सुरांची राणी
सुर सारे तिच्या नावाने उजळले
आशा… सुरांनी जग सारे जिंकून घेतले.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
