You are currently viewing कन्या महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

कन्या महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी यांचे योगदान खूप महत्त्वाचे असून त्यांचे आचार,विचार आपण आचरणात आणले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रा. डॉ. सुभाष जाधव, अनिल कुंभार, संतोष बोराटे, सोमनाथ गायकवाड,प्रा. प्रमिला सुर्वे, श्री रत्नपारखी, प्रकाश पाटील,श्री सुतार आणि श्री गिरी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते ,प्रशासकीय सेवक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभारप्रदर्शन प्रा.संगिता पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा