You are currently viewing आधुनिक जग

आधुनिक जग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आधुनिक जग*

 

आजच्या आधुनिक पिढीची

नित्य बदलती जीवनशैली

हवामान , राहणीमान… ,

बदलताहेत चुली नि मुली…..!..१

 

कामात बदल असतो जरी ,

निवांत विश्रांत क्षण, पण

आता सकलची पालटतोय

एकेक क्षणाचा कण नि कण…..!…२

 

जुने ते सोने विसरत

चाललय संपूर्ण जग….

थांबायला वेळ नाही

कामातची सारे मग्न मग…..!…..३

 

गेलीय ती चुलीवरची

खमंग लज्जतदार चव

गॅसवरचा स्वयंपाक ,

मॅगी नि पिझ्झा बेचव……!!…….४

 

हिरवेगार रानवन झालय

आता सिमेंटचे जंगल…..!

आधुनिक तंत्रज्ञानाने नच

झुळझुळणारे स्रोत नि जल…….!!…..५

 

मानवी जीवन होत आहे

आता रोबोची दुनिया…..

बेकारी नि महागाईने

बदललीय माया नि काया…….!!..६

 

*मानसी जामसंडेकर, गोवा*

प्रतिक्रिया व्यक्त करा